Shrirampur : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी साध्या पद्धतीने विवाह सोहळा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
श्रीरामपूर |प्रतिनिधी | कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाउन ची भयानक परिस्थिती उद्भवली आहे.या मुळे सर्व जनता ही आपल्या घरात बंदिस्त झाली आहे,पण या सर्व घटनांच्या चालता एप्रिल मे महिना हा लग्न सराईचा महिना असतो हे सर्वांना माहीत आहे.दर वर्षी या महिन्यामध्ये अनेक वधु-वर सप्तपदी घेऊन 7 सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतात अर्थात विवाहबद्ध होतात.विवाह संस्कार हा गृहस्थ आश्रमातला महत्वाचा संस्कार मानला जातो.याच काळात अनेक नवीन जोडप्यांचा विवाह बद्ध होऊन साता जन्माच्या गाठी बांधत असतात,हा सोहळा म्हणजे मोठा थाटा माटात पार पडणारा सोहळा पण या कोरोना विषाणू मुळे सर्व हौस,मजा,तो आनंद या सर्व गोष्टींचा या वर्षी जणु काय अंत च झाला कारण कोविड-१९ मुळे सोशल डिस्टनसिंग चा नाविन्यपूर्ण शब्द आपल्या आयुष्यात आला यामुळे अनेक लोकांनी एका ठिकाणी एकत्र न येणे हे अपेक्षित आहे.आणि लग्न म्हणलं की गर्दी पाहुणे-राऊळे हे आलेच.नियोजित लग्न विधी होणं ते तितकच गरजेच असल्यामुळे आजकाल सर्व लग्न सोशल डिस्टनसिंग चे पालन करत होत असलेली आपणास दिसत आहे त्या पैकी एक म्हणजे काल झालेलं हे ऋषीकेश आणि करुणा चा झालेला हा लग्नविधी.मेकॅनिकल इंजिनिअर असलेला हा होत करू तरुण ऋषिकेश रमेश माळवे,रा.श्रीरामपूर अहमदनगर व शास्त्र शाखेची पदवी अर्थात बी एससी केलेली मुलगी करुणा वसंत गोटे रा.प्रवरा संगम,औरंगाबाद यांचा विवाह अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळी मध्ये प्रवरा संगम या ठिकाणी संपन्न झाला.या वेळी मावळे कुटुंबातील सदस्यांनी काही गरीब अन गरजू लोकांना अन्नदान करून आपला विवाह सोहळ्याचा आनंद द्विगुणीत केला.नवविवाहित दाम्पत्याने तोंडावर मास्क लावून सप्तपदी घेतली,त्याच बरोबर भटजी बुवांनी देखील मास्क लावून मंत्र पठण केले.यामुळे सर्व सोहळा हा सोशल डिस्टनसिंग चे पालन करत पार पडला...

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post