साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मे 2020
श्रीरामपूर | गेल्या चार-पाच दिवसापासून शहराची बाजारपेठ चालू करण्यात आली. वारंवार नियमांचे उल्लंघन होणारे चित्र शहरात दिसत आहे. नागरिक सामाजिक अंतर न ठेवता शहरात वावरत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्रीरामपुरात औरंगाबाद येथून आलेल्या ३२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात सोमवारी सकाळी मुंबईहून आलेला व विलगीकरण कक्षात असलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आला. परिस्थिती डोळ्यासमोर ढासळत असतांना स्थानिक प्रशासन अजून कशाची वाट बघत आहे?? असा संतप्त सवाल युवा सेनेचे उमेश पवार यांनी केला आहे.
युवा सेनेचे उमेश पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, बाजारपेठ सुरू झाल्या असतांना अशा गोष्टी घडणं घातक आहे. सहा दिवसापुर्वी बाजारपेठ सुरु करण्याअगोदर जबाबदारी कोण घेणार?? असा सवाल देखिल आपण केला होता ; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा आटोक्यात आणणे शक्य नाहीये त्यामुळे कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता पुर्णपणे बाजार पेठ बंद करावी. कोरोनाने आपल्या गावात दोन खाती उघडले आहे. त्यामुळे सुरवात होताचं हे थांबावने सर्वांसाठी चांगले राहील असेही त्यांनी म्हंटले आहे.
कोरोना आपल्या दाराबाहेर येऊन ठेपला आहे आणि हे सर्व दिसतं असतांना देखिल स्थानिक प्रशासन काय करत आहे??कशाची वाट बघत आहे?? श्रीरामपूरमध्ये अजुन पेशंट वाढले तर याला जबाबदार कोण?? असा संतप्त सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.
शहराचे व तालुक्याचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बाजारपेठ पुन्हा बंद करावी आणि तशी नागरिकांची देखिल इच्छा असल्याचे उमेश पवार यांनी म्हंटले आहे.