Shrirampur : आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांच्या परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे ; आप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
श्रीरामपूर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती ओढवलेली आहे. यामुळे कित्येक जणांच्या हातचा रोजगार बुडाला आहे. यामुळे शासन, प्रशासन अनेक प्रकारच्या सूट देत आहेत त्यात मोफत किराणा, मोफत राशन इत्यादी वस्तू प्रत्येक नागरिकांना मिळाव्यात याचा सर्वोतोपरी विचार शासन दरबारी होत आहे. या भयानक परिस्थितीमध्ये उच्च माध्यमिक, तंत्र शिक्षण,विविध पदवीच्या परीक्षा येत्या काळात घेण्याचा निर्णय विद्यापीठ स्तरावर घेण्यात आलेला आहे. या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर परीक्षा शुल्क आकारले आहेत. या कोरोनाच्या काळात कित्येक  विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणे शक्य नसल्याचे लक्षात येत आहे.या वैश्विक आपत्ती च्या काळात माणूस हा पोटाची खळगी भरण्यासाठी जीवच रान करीत आहे.अश्या काळात विद्यापीठाने सर्वच शैक्षणिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करावे, असे निवेदन आम आदमी पार्टी चे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्हा प्रवक्ता प्रविण जमधडे यांनी अशी मागणी  उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत , व कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर पुणे विद्यापीठ, पुणे  यांना लेखी स्वरूपात केली आहे.


           निवेदनात जमधडे यांनी पुढे  म्हणाले आहे की, सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केल्याने परीक्षेत बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही,विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ न केल्यास अनेक विद्यार्थी परीक्षेत बसणार नाही कारण आज लॉक डाउन मूळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे.परिणामी नागरिकांकडे घर खर्चाला ही पैसे उपलब्ध नाहीत,एकी कडे विद्यापीठ स्तरावर आगामी होणाऱ्या परीक्षा साठी चे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा व प्रत्येकाला परीक्षेत बसू द्यावे असे निवेदन आप चे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली उत्तर नगर जिल्हा प्रवक्ता प्रविण जमधडे यांनी दिले आहे या निवेदनात तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, प्रताप राठोड,राहुल रणपिसे, राजुभाई शेख,भारत डेंगळे, सलीम शेख,रोहित भोसले,राजेश पाटील,दीपक परदेशी,अक्षय कुमावत,  यशवंत जेठे,हरिभाऊ तुवर,जयेश पाटील,आनंद पाटील,बाबासाहेब गवारे,भैरव मोरे आदींनी सहमती दिली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post