साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 मे 2020
सात्रळ |प्रतिनिधी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तालुक्यातील मागासवर्गीय समाजातील व अपंग दिव्यांग नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे पोटभर अन्न मिळत नाही. वाढती महागाई बघुन देशावर महामारीचे संकट आल्यामुळे सात्रळ येथील सामाजिक कार्यकर्ते रवी ब्राम्हणे यांनी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खामकर यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविले होते.
जाहिरात : Saikiran Times
आपल्या व्यवसायाची जाहिरात असंख्य वाचकांपर्यंत पोहोचवा. संपर्क मो. 9960509441
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा मागासवर्गीय 15%, अपंग 5% व ग्रामपंचायत मधील वसूल निधी मधून गरीब निराधार महिलांना गोरगरीब जनतेला किराणा मालाचे किट वाटप करण्यात यावे. सध्या कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील मजूर, शेंतमजूर, बिगारी, अंपग व निराधार गरीब महिला यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे .सध्या देशात लाॅकडावूनला दिड ते दोन महिने उलटून गेले त्यामुळे सर्व सामान्य जनतेला हाताला काम नाही. त्यांच्या वर कोरोना व्हायरस पेक्षा घरात राहून उपासमारीची मोठी भिती निर्माण झाली आहे. असे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या प्रकरणाची तात्काळ गांभीर्याने दखल घेत गटविकास अधिकारी खामकर यांनी तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच यांना आदेश देऊन 15 टक्के व 5 टक्के निधीतुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मागासवर्गीयांना व अपंगांसाठी जीवन आवश्यक वस्तूचा पुरवठा करण्याचे आदेश तालुक्यातील ग्रामपंचायतींना दिले आहे.
मागणी मान्य केल्याबद्दल ब्राम्हणे यांनी गट विकास अधिकारी खामकर यांना धन्यवाद देऊन या निर्णयाचे स्वागत केले आहे.