Nevasa : वाढदिवसानिमित्त तरुण शेतकऱ्यांकडून गोशाळेस 4 टन चारा भेट ; सामाजिक भान जपत तरुण शेतकऱ्यांकडून आदर्श उपक्रम

मोरयाचिंचोरे ता नेवासा येथील तरुण शेतकऱ्यांनी श्री क्षेत्र डोंगरण येथील गोशाळेस 4 टन चारा  भेट दिला यावेळी यावेळी गोवर्धन मोरे,कमल मोरे,रुपाली मोरे,शीतल जंगले आदी उपस्थित होते.
_______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 9 मे 2020
नेवासा (दादा दरंदले) सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विविध समारंभास फाटा देत  नागरिक सामाजिक भान जपत मदतीचे उपक्रम राबवत आहेत. तीव्र उन्हाळा व त्यातच  आलेला लॉकडाऊन त्यामुळे मोठ्या कष्टाने  स्व:यसेवी संस्थांनी सुरू केलेल्या गोशाळा चाऱ्या अभावी अडचणीत आहेत. गाईचे चाऱ्यावाचून हाल होत आहेत. ही गरज ओळखून नेहमी सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथील तरुण शेतकरी संजय मोरे यांनी अल्प पाण्यावर ठिबक सिंचनच्या मदतीने फुलवलेलेली मका पत्नी सौ रुपाली मोरे व मावस बहीण सौ शीतल जंगले यांच्या वाढदिवसानिमित्त   शुक्रवारी (दि. 8 मे 2020)  रोजी श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड येथील गोशाळेस 4 टन माका चारा भेट दिला.


          यावेळी गोवर्धन मोरे,संजय मोरे,राजेंद्र मोरे,दीपक झवर,सौ कमल मोरे,सौ रूपाली मोरे,सौ शीतल जंगले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले की वाढदिवस हा आपण सामाजिक भान जपत केला पाहिजे मी स्वतः शेतकरी आहे उन्हाळ्यात गोशाळेस गाईना चाऱ्याची अडचण येते मी नियमित डोंगरगण येथे गोरक्षनाथच्या दर्शनास जातो तेथे 100 ते 150 गाई आहेत या गाईना चाऱ्याची गरज ओळखून मी पत्नी व बहिणीच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेस चारा भेट दिला.आपण सर्वानीही आपल्या परिसरातील गोशाळांना वाढदिवसानिमित्त  इतर खर्चास फाटा देत चारा,व इतर रुपात मदत देत गोशाळांना सहकार्य करावे.

दरवर्षी वाढदिवस असतो तो आम्ही केक कापून साजरा करतो परंतु यंदा  माझे पती यांनी सामाजिक भान जपत गोशाळेस चारा भेट दिला यामुळे माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थक झाला याचा मला मनस्वी आनंद झाला.आपणही वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत समाजसेवी उपक्रम राबावे.दरवर्षी आम्ही कुटुंब सदस्याचा वाढदिवस साजरा न करता गोशाळेस चारा भेट देणार आहोत.
            - सौ रुपाली संजय मोरे,  मोरयाचिंचोरे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post