MOOC अंतर्गत शिक्षकांना इंग्रजीचे ऑनलाईन प्रशिक्षण ; 13 शिक्षक सुवर्णपदकाचे मानकरी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन  असतांनाच 'वर्क फ्राॅम होम' सुरू असूनही बेलापुर, उक्कलगाव आणि नगरपालिका या तीनही केद्रांतील शिक्षकांनी दिलेली कर्तव्ये पार पाडत इंग्रजी विषयाचा अॉनलाईन मुक ( MOOC)अभ्यासक्रम उत्कृष्ट रितीने पुर्ण करत सुवर्णपदक, रजतपदक, व कास्य पदकाच्या प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहे.

      डिसेंबर 2019 पासून सुरू झालेल्या या ऑनलाईन कोर्सची 10 मे ही अंतिम मुदत देण्यात होती. बेलापूर,उक्कलगाव,आणि न.पा या तीनही केंद्रातून 51 शिक्षकांनी सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती सर्वच्या सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी 100 % सहभागासह विहीत कालावधीत विशेष प्रविण्यासह हा कोर्स पुर्ण करून घवघवीत यश संपादन केले आहे. 51 पैकी 13 शिक्षकांना सुवर्ण प्रमाणपत्र,
कास्य प्रमाणपत्र 35 शिक्षकांना रजत प्रमाणपत्र, आणि 3 शिक्षकांनी कास्य प्रमाणपत्र मिळवून हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. 

        या यशात बेलापूर व उक्कलगाव दोन्ही केंद्राचे केंद्र प्रमुख शेलार सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या अभ्यासक्रमात राज्य पातळीवर समन्वयक नेमणूक जिल्ह्यातील शिक्षकांपर्यत बैठका व वेबिनारव्दारे समुपदेशनातून हा अभ्यासक्रम पोहोचविला जातो आहे  mooc - massive open online course हा प्रादेशिक विद्या प्राधिकरण आंग्ल भाषा तत्वज्ञ औरगाबाद यांनी सुरू केलेला राज्यातील पहिला इंग्रजी विषयाचे प्रशिक्षण आहे बेलापूर उक्कलगाव आणी नगरपलिका श्रीरामपूर या तालुक्यातील तीन केंद्रासाठी शिक्षक मुकुंद कार्ले यांनी mooc समन्वयक म्हणून उकृष्ठ रितीने जबाबदारी पार पाडली यशाबद्दल   गटशिक्षणधिकारी मा सुनिल सुर्यवंशी,शिक्षण विस्तारधिकारी श्रीमती उज्वला गायकवाड, ( ई सी ए डी आय ई टी )चे श्रीमती सुनिता जामगांवकर,केंद्रप्रमुख उत्तम शेलार यांनी समन्वयक मुकुंद कार्ले आदीनी यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post