Bjp : महाआघाडी सरकारचा काळे झेंडे, मास्क लावून श्रीरामपूर भाजपा आणि युवा मोर्चाकडून निषेध : गणेश राठी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मे 2020
श्रीरामपूर | राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेले अपयश, लॉकडाउनमुळे शेतकरी, शेतमजुरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांच्यासाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे आदी मागण्यांसाठी प्रदेश भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या ‘महाराष्ट बचाव’ आंदोलनात शुक्रवारी भारतीय जनता पार्टी, श्रीरामपूर शहरच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

           राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट सरकार अपयशी ठरले असून, दरदिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांची टेस्ट केली जावी, अशी वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना मृत्यूच्या खाईत लोटत असल्याची तक्रार करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट बचाओ आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्ट सरकारने शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांना वाऱ्यावर सोडले असून, वाहतुकीची व्यवस्था नसल्याने मजुरांना पायीच मार्गक्रमण करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीची कोणतीही व्यवस्था केलेली नाही, परिणामी शेतकरीही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी भाजपने केली यावेळी शहर भाजपा चा वतीने हातात काळे झेंडे तोंडाला काळा मास्क लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

         यावेळी श्रीरामपूर शहर भाजपाचे नेते गणेश राठी, मा शहराध्यक्ष मारुती बिंगले, विलास थोरात, राजेंद्र कांबळे, बाळासाहेब अहिरे, गणेश अभंग, संदीप सातपुते, संदीप विश्वमभर भाजप युवा मोर्चा चे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवी पंडित, रुपेश हरकल, अमोल अंबिलवादे, आदी उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post