साईकिरण टाइम्स ब्युरो, 14 मे 2020
श्रीरामपूर | भारतीय जनता पार्टी, श्रीरामपूर आणि सूर्य चॅरिटेबल ट्रस्ट (डॉ ललित सावज) यांचे संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (कोरोना रोगात) भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रजी गोंदकर यांचा हस्ते वितरण करण्यात आले.
शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या होमिओपॅथिक व आयुर्वेदिक औषधाचा प्रयोग आयुष मंत्रालयाने हजारो रुग्णावर केला होता. हे औषधे घेतलेल्या रुग्णाचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर औषधे ना घेतल्या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथिक औषध अत्यंत उपयोगी आहे.
तसेच कर्करोग, मधुमेह, दमा, मुतखडा, मूळव्याधी, कावीळ, वात व पित्तविकार, मणक्याचे पाठीचे आजार, जुनाट सर्दी, मूत्रमार्गाचे आजार, चक्कर येणे आदी हजारो रुग्ण होमिओपॅथिकनि बरे झाल्याचे समजले.
करोनाचा संकटावर मात करण्यासाठी अलिओपॅथिक बरोबर होमिओपॅथिक उपचारही उपयुक्त आहे, यासाठी भाजपा श्रीरामपूरच्या वतीने भाजपाचे वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ ललित सावज यांच्याकडे हे औषध मोफत उपलब्ध आहे.
यावेळी भाजपा चे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रजी गोंदकर, श्रीरामपूर भाजपाचे नेते गणेशजी राठी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, मा शहराध्यक्ष मारुती बिंगले, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ ललित सावज, रामभाऊ तरस, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, नितीन लोहाटे, राजेंद्र चिंतामणी, रवी पंडित उपस्थित होते.