व्हिडीओ पहा
साईकिरण टाइम्स ब्युरो, 14 मे 2020
बेलापूर | प्रतिनिधी | बेलापूर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रेरणा क्षत्रिय (माळोकर) यांचा
"लढा कोरोनाशी" हा प्रबोधनात्मक व्हिडीओ तिच्या 'एस एस के कीटी' ग्रूपच्या माध्यमातून सध्या सोशल मीडियावर बराच गाजत आहे.
प्रेरणा क्षत्रिय ( माळोकर) ह्या बेलापूर येथील पत्रकार दिपकसा क्षत्रिय यांच्या कन्या आहेत. मुळातच सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक पारितोषिक तिने पटकाविले असून कुकीज अँड बेकरीजचे येवल्यात ट्रेनिंग सेंटर चालावत असून ऑफिशियल ब्युटीशीयन म्हणून कार्यरत आहेत.
"कोरोनाशी लढा" या उपक्रमाबद्दल
तीचे कॉलेजच्या प्राचार्या साहित्यिक डॉ.गुंफा कोकाटे ,तसेच अशोक स .सा.कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे , व अनेक मान्यवरांनी तिचे सर्वत्र अभिनंदन केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.