साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 एप्रिल 2020
श्रीरामपूर | सरकरने गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा केले जाणार असल्याचे जाहीर केले होते. आज बुधवारी ( दि. 8) सकाळी 11 वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत खातेदारांनी पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर रस्त्यावर आखलेल्या चौकोनात उभे राहून सोशल डिस्टन्स ठेवत लावल्या रांगा होत्या.
![]() |
श्रीरामपूर : सोशल डिस्टंसिंग ठेवत बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेदारांनी रांगा लावल्या होत्या. ( छाया : रुपेश सिकची ) |
![]() |
छाया : रुपेश सिकची, श्रीरामपूर |
जगभरात कोरोना विषाणूने फैलाव केला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात सध्या लोकडाऊन चालू आहे. लोकांना आपला उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झालं. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या गरिबांना बसत आहे. सरकरने गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये दर महिन्याला 500 रुपये जमा केले जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार बँकेत पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे. बँकेबाहेर रस्त्यावर आखलेल्या चौकोनात उभे राहून सोशल डिस्टन्स ठेवत खातेदारांनी पैसे काढण्यास सुरवात केली.