साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 एप्रिल 2020
श्रीरामपूर | कोरोनासारख्या भिषण परिस्थितीत नगरपरिषदेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कायम आणि कंत्राटी कामगारांचा संरक्षण विमा काढण्याची मागणी श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
ज्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने त्यांच्या सेवेत असलेल्या कायम व कंत्राटी पद्धतीमध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोना पासून संरक्षण म्हणून प्रत्येकी एक कोटी रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आपल्याही ही श्रीरामपूर नगरपरिषदेने आरोग्याच्या बरोबरच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सवर्च कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विमा काढून संरक्षण द्यावे अशी, आग्रहाची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.
अनेक हात मदतीसाठी पुढे येतील.....
संकटाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देण्याऱ्या कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संरक्षण विमा प्रशासनाने त्वरित काढावा त्याकरिता आमच्या सारख्या पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, मित्र मंडळे यांची मदत लागली तर प्रशासनाने हाक दिल्यास या सामाजीक कार्यात अनेक हात मदतीसाठी उभे राहतील असा विश्वास ससाणे यांनी बोलून दाखवला आहे.
गेल्या महिनाभरापासून आरोग्य व अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करतांना दिसत आहे. त्यामध्ये नगरपरिषद, आशासेविका, अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग आणि इतर सर्वच विभागता काम करणाऱ्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोठ्या रकमेचा विमा काढणे गरजेचे आहे जेणेकरून आपले जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील आपल्या पाठीशी प्रशासन उभे असल्याचा विश्वास येईल त्यामुळे प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ससाणे यांनी केली आहे.