Shrirampur :शेती महामंडळाच्या पडीक क्षेत्रांत भीषण आग ; ग्रामस्थांच्या सतर्कतेने आग आटोक्यात


साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील लजपतरायवाडी येथील शेती महामंडळाच्या पडीक क्षेत्रांत काल ( दि.6) दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आणण्यास श्रीरामपूर नगरपालिका अग्निशामक दलाला यश आले. 
                
                               
       एकलहरे कार्यक्षेत्रात शेती महामंडळाचे पडीक क्षेत्र आहे. आज दुपारी लजपतरायवाडी वस्ती समोरील  शेती महामंडळाच्या  सर्व्ह नंबर 17, 18, 19 च्या क्षेत्रांत अचानकपणे लाग लागल्याचे परिसरात असलेल्या स्थानीक तरुणांच्या लक्ष्यात आले. लगेचच तरुणांनी घटनेची माहिती टिळकनगर स्टेट फार्मिंगचे मॅनेजर अशोक कोल्हे यांना दूरध्वनीवरून देत घटनास्थळी धाव घेत आग विजविण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यासह, कर्मचारी वर्गाने काही वेळातच घटनास्थळी धाव घेत नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला बोलविले. काही तासांच्या परिश्रमा नंतर आग आटोक्यात आली. आग लागली तेव्हा वस्तीवरच्या महिला जनावरांना चारा आणण्यासाठी या पडीक क्षेत्रांत चारा घेत होत्या. घटनास्थळी पत्रकार लालमोहमद जहागीरदार, उपसरपंच रवींद्र भालेराव यांनी भेट दिली.


        यावेळी शेती महामंडळाचे अशोक कोल्हे, संजय तोरणे, अरुण काळे, बाळू लगड, सुरेश हिवराळे सह आग आटोक्यात आणण्यासाठी गणेश उमाप, श्रीधर सोनवणे, विलास जाधव, ज्ञानेश्वर काळे, संदीप हेलिंगे, जावेद शेख, तुळशीराम हेलिंगे, राहुल खंदारे,अजय वंजारे,  दीपक सूर्यवंशी, दत्तू गायकवाड, अरबाज शेख, रामदास झिने, रोहन साबळे, करण हेलिंगे, राहुल खंडागळे, अविनाश जाधव, अल्ताफ शेख, रवी पवार, आदर्श साबळे, अजय सोनवणे, शिवाजी पवार सह ग्रामस्थांनी मदत केली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post