Shrirampur : श्रीरामपूरचे नागरिक वाऱ्यावर, आमदारांचे घर व संपर्क कार्यालय बंद असल्याचा भिसे यांचा दावा



साईकिरण टाइम्स ब्युरो, 24, एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोणीही उपाशी राहणार नाही, अशी भीमगर्जना करून वर्तमानपत्रात हिरो ठरणाऱ्या आमदार लहू कानडे यांचा दावा खोटा ठरला आहे. दोन दिवसांपासून आमदारांचे श्रीरामपूर संपर्क कार्यालय व निवासस्थान बंद असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी फोटोसह प्रसिद्ध केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


          याबाबत अधिक माहिती देताना भैया भिसे म्हणाले की, कोरोनाच्या संकटाने गोरगरिबांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत  आमदार लहू कानडे यांनी दानशूर संस्था, संघटना, लोकांच्या माध्यमातून किराणा किटचे सामान गोळा करत गुजराथी मंगल कार्यालय येथून गरिबांना वाटप करण्याचे जाहीर केले. हे वाटप करताना ग्रामीण भागाचा विचार केला गेला नाही. सोबतच शहरातील फक्त वॉर्ड नं.२ येथील गरिबांना वाटप केल्याचे खुद्द आमदारांनी प्रसिद्धीस दिले. मात्र खरी परिस्थिती बघितली तर  शहरातील हजारो गरिब कुटुंबांना मदत मिळाली नाही. ज्यांना मदतीची अपेक्षा आहे असे अनेक गरीब लोक दोन दिवसांपासून आमदारांच्या घरी, कार्यालयासह गुजराथी मंगल कार्यालयात पायपीट करत जात आहे. मात्र दोन्ही ठिकाणी कुलुप असल्याने गरिबांची निराशा होत असल्याची खंत असल्याचे भिसे यांनी म्हटले आहे.

            श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे हे ऐनसंकटात श्रीरामपूर मतदार संघातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून निघून गेल्याने गोरगरीब हवालदिल झाले असून कानडे यांच्यासाठी निवडणुकीत जीवाचे रान करणा-या कार्यकर्त्यांना त्यांच्याच विरोधात जाण्याची वेळ आली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post