Ahmednagar : जिल्ह्यात आत्तापर्यंत 24 जणांची कोरोनावर मात, आज 4 जणांना डिस्चार्ज



साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 एप्रिल 2020
अहमदनगर | जिल्ह्यामध्ये आढळलेल्या 38 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 24 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. आज 4 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना  डिस्चार्ज दिला आहे. 

      आज शुक्रवारी (दि. 24) येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आलमगीर येथील 2,   सर्जेपुरा येथील 1 व आष्टी (जि. बीड) येथील 1,  असे एकूण 4 जणांना  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. चारही रुग्णांचे 14 दिवसानंतरच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात आतपर्यंत 38 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 38 कोरोना बधितांपैकी 24 जणांना यशस्वी उपचारानंतर  डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 12 जणांवर उपचार चालू आहेत. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post