![]() |
प्रातिनिधिक छायाचित्र |
साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 एप्रिल 2020
वडाळा महादेव ( राजेंद्र देसाई ) कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असून देशात तसेच राज्यात भीषण संकट ओढवले आहे. प्रसंगी गृहरक्षक दलातील जवान पोलिस तसेच प्रशासकीय यंत्रणेने बरोबर कर्तव्य बजावत आहे. आज जवानांवर आर्थिक संकट ओढवले असून, सध्या होमगार्ड सैनिक महत्त्वाचे कर्तव्य बजावून देखील कर्तव्य भत्ता मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य तसेच इतर ठिकाणी जिल्ह्यामध्ये जवानावर आर्थिक संकट ओढवले आहे. सदर जवान काम करीत असताना काही नागरिक जाणून-बुजून त्रास देत असताना दिसत आहे.
होमगार्ड सैनिक रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना नागरिकाकडून शिवीगाळ तसेच मारहाण करताना सध्या चित्र दिसत आहे प्रशासकीय तसेच वरिष्ठ पोलिस व होमगार्ड अधिकारी यांचेकडून होमगार्डला संरक्षण देण्याचे कार्य सुरू असून त्रास देणाऱ्या नागरिकांना पोलिस यंत्रणेकडून कठोर शासन करण्यात येत आहे सध्या आपण सुरक्षित व घरातच राहण्यासाठी पोलीस तसेच महसूल विभाग वारंवार सूचना करत आहेत याच आदेशाचे पालन करत होमगार्ड सैनिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत जेणेकरून आपल्या परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण मिळावे म्हणून पोलीस दलाच्या मदतीसाठी होमगार्ड सैनिक प्रयत्नशील आहेत कामाचा ताण त्यांच्यावर ही आहे त्यामुळे प्रत्येकाने अत्यावश्यक सेवा करणाऱ्या व्यक्तींचा व होमगार्डचा सन्मान करावा विशेष बाब म्हणजे होमगार्ड सैनिक गरीब व शेतकरी कुटुंबातून देशसेवेसाठी होमगार्ड दलात भरती झाले आहेत सर्वजण विविध ठिकाणी मोलमजुरी रोजंदारी काम व आपले स्वतःचे व्यवसाय शेतीकाम करत असतात बरेचसे सैनिक शेतकरी कुटुंबातील आहे .
गृहरक्षक दल हे स्वतंत्र काळापासून काम करणारे दल आहे त्याला ऐतिहासिक वारसा निर्माण झाला आहे देशामध्ये आपत्ती काळात मुंबई प्रांतात ६ डिसेंबर १९४७ साली स्थापन झालेले गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड होय पोलीस दलाच्या मदतीला होमगार्ड दलाची मोठी मदत होत असत एक वर्षापासून या होमगार्ड जवानावर उपासमारीची वेळ आली असून विविध कारणामुळे सात ते आठ महिन्यापासून कर्तव्य भत्ता तसेच पुनर्नियुक्ती व सेवा समाप्ती अशा कारणामुळे अनेक होमगार्ड सैनिक संकटात सापडले आहे कायदा व सुव्यवस्था सण-उत्सव परीक्षा निवडणूक बंदोबस्त व अशा व विवीध कालावधीत सेवा बजावून देखील कर्तव्य मिळत नाही सध्या कोरोना महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांबरोबर होमगार्ड ही कर्तव्य बजावत आहे होमगार्ड सैनिकावर खरोखरच आज आर्थिक संकट निर्माण झाले आहे होमगार्डच्या बाबतीत शासनदरबारी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तरी लवकरात लवकर अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचे शासकीय यंत्रणे मधून माहिती मिळत आहेत तरी नागरिकांनी सदर होमगार्ड बाबत गंभीर विचार करून त्यांचा आदर करणे गरजेचे आहे.