Shrirampur : वडाळा महादेव परीसरात तंबाखू विक्रेत्यांना सुगीचे दिवस ; 10 रुपयाची पुडी 35 रुपयाला



           'कुणी तंबाखू देता का तंबाखू'

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
वडाळा महादेव|राजेंद्र देसाई |श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील तंबाखू प्रेमी बहाद्दरांना 'तंबाखू देता का तंबाखू' , अशी म्हणण्याची वेळ आली आहे.  सध्या राज्यात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असून  साधारण महिनाभरापासून लॉक डाऊन सुरू आहे तसेच तंबाखु प्रेमींना बाहेर फिरणे अवघड झाले आहे. यामध्ये काही व्यावसायीकडे तंबाखु  उपलब्ध होती त्यांनी तंबाखूचे दर वाढविण्यास सुरुवात केली तर लॉक डाऊनचा  कालावधी वाढल्याने व्यावसायिकांनाही तंबाखू मिळणे अवघड झाले. 

          10 रुपयाची पुडी 35 रुपयाला 

         त्यामुळे 10 रुपयाची पुडी ३५ रुपये किमतीने विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये ठरावीक ठिकाणीच मिळत असल्याने अनेकांचा गोंधळ उडत आहे. सध्या ज्याच्याकडे तंबाखू पुडी व तो इतरांना एखादा विडा देतो. सध्या खूप दानशूर असा समजला जात आहे त्यामुळे अनेकांना तंबाखूची तलफ असल्याने काय करावे सुचेना असे झाले आहे. त्यामुळे अनेक तंबाखू शौकिनांना 'तंबाखू देता का तंबाखू' , अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post