साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 एप्रिल 2020
श्रीरामपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन रात्रंदिवस प्रयत्न करीत असताना लॉकडाऊन मध्ये वगळण्यात आलेल्या बँकींग व्यवस्थेत असलेल्या एटीएम मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, नागरिकांचा स्पर्श ए टी एम मशिनीला होत असल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीची दखल प्रशासनासह बँकांनी घेऊन शहरातील प्रत्येक एटीएम मशीन शेजारी सॅनिटायझर ठेवावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रवक्ता प्रवीण जमधडे यांनी केली आहे.