Shrirampur : .......अन श्रीरामपूरकरांनी अनुभवले थरारक 50 तास

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) नेवासा येथील एक पेशंट शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर कडे ट्रीटमेंट साठी येतो......दोन दिवस ट्रीटमेंट घेतो...... सर्दी खोकला बरा होत नसल्यामुळे त्याला शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये पाठवले जाते....... तेथील डॉक्टर त्याला तपासतात...... कोरोना सदृश्य लक्षणे दिसल्यामुळे त्याची रवानगी सिविल हॉस्पिटल अहमदनगर येथे केली जाते...... आणि इकडे श्रीरामपुरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येते....... तपासणीनंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो आणि आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ सुरू होते...

           शहरातील सुप्रसिद्ध खाजगी डॉक्टर, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, खाजगी रुग्णालयातील पॅथॉलॉजी लॅब मधील टेक्निशियन या सर्वांना उचलून नेले जाते. काहींची रवानगी सिव्हिल हॉस्पिटलला केली जाते तर काहींची लोणी येथील हॉस्पिटललात्यां. त्यांचे स्त्राव चाचणी साठी पाठवले जातात. शहरांमध्ये सदर रुग्ण ज्यांच्या घरी जाऊन आला होता त्या घरातील सदस्यांची सुद्धा तपासणी केली जाते. मग प्रतीक्षा सुरू होते ती येणाऱ्या चाचणी अहवालाची. तोपर्यंत शहरात सर्वत्र या घटनेची चर्चा झालेली असते. पुढे अनेक तर्कवितर्क सुरू होतात. खाजगी डॉक्टरकडे जेवढ्या पेशंटनी त्या दिवशी तपासणी केली त्या सर्वांची लिस्ट वैद्यकीय यंत्रणेमार्फत सर्वत्र पाठवली जाते. पेशंट कोणत्या गावाचे होते तेथे संपर्क केला जातो. आणि सर्व पेशंटना घरातच कोरणटाईन केले जाते . ज्या डॉक्टरांचे नमुना स्त्राव चाचणी साठी पाठवलेले होते त्याच्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर असल्यामुळे अधिक काळजी व्यक्त केली जाते. कारण कोरोनाचे वातावरण सुरू झाल्यापासून या डॉक्टर महोदयांनी दिवसाचा रात्र करून शहरांमध्ये आणि तालुक्यांमध्ये आपली यंत्रणा राबविलेली असते. प्रांताधिकारी यांच्यापासून तहसीलदार, पोलीस अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठका घेऊन कोरोणापासून तालुका मुक्त ठेवण्याचे नियोजन त्यांनी केलेले असते आणि जर दुर्दैवाने ते पॉझिटिव्ह निघाले तर काय ?असा प्रश्न प्रत्येक जण विचारीत असतो. कारण ते जर पॉझिटिव्ह आले तर तालुक्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोरोंटाईन करण्याची वेळ येणार असते. म्हणून प्रत्येक नागरिक त्या अहवालाची वाट पाहत असतो. बुधवारी दुपारी चार वाजता अचानक बातमी येते श्रीरामपूर चे सर्व जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सर्वजण सुटकेचा निश्वास सोडतात. नगर येथे ऍडमिट केले डॉक्टर व स्टाफ चे सर्व लोक पुन्हा श्रीरामपूरला आणले जातात आणि येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना कोरणटाईन केले जाते. सर्व शहरवासी देवाचे आभार मानतात आणि या कोरोणापासून पूर्ण शहराचे रक्षण करो अशी मनोभावे प्रार्थना करतात. 50 तासांचा थरार अत्यंत रोमांचकारी तसेच काळजीत टाकणारा असतो. परंतु रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांचे  चेहरे आनंदाने उजळून निघतात. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post