Ahmednagar : जिल्ह्यातील सारी रुग्णांची संख्या 42 वर , जिल्ह्यातील 21 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह; 33 अहवालाची प्रतीक्षा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 एप्रिल 2020
अहमदनगर | जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी २१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

दरम्यान, काल पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

        जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post