साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 एप्रिल 2020
संगमनेर | जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे .संसर्ग वाढू नये यासाठी भारतभर लॉक डाउन केलेले आहे,मात्र हातावर पोट असलेल्या कुटुंबांना हाताला काम व उत्पन्न नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रशासन व अनेक स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहे.
राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेने संगमनेर विभागातील २५ गावांमधील विधवा ,परितक्त्या ,अपंग व हातावर पोट असलेल्या गरजू कुटुंबांचा सर्वे करून त्यातील ६०० कुटुंबांना मागील आठ दिवसांमध्ये जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे . या मध्ये खाद्य तेल,मूग डाळ,तूर डाळ,बेसन पीठ,गूळ,शेंगदाने ,मठ ,हळद, मीठ,मिरची पावडर,डेटॉल साबण इ. वस्तूंचा समावेश होता.
मा.प्रांत अधिकारी श्री.मंगरुळे साहेब, तहसिलदार श्री.अमोल निकम साहेब आणि गट विकास अधिकारी श्री.सुरेश शिंदे साहेब यांच्या बरोबर योग्य प्रकारे समन्वय ठेऊन गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत पोहचविण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश पाळंदे यांनी वरील उपक्रमासाठी निधी संकलन केले.संस्थेचे सचिव डॉ.दिवेकर यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कोरोना पासून काळजी कशी घ्यावी तसेच ग्रामीण भागातील लोकांना कोरोना बद्दल कशा प्रकारे जागृत करावे याविषयी माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त श्री.आदिक,संस्थेचे कार्यकर्ते श्री.प्रदिप दारोळे,मंगल कदम,मंगल काळे,योगेश नवले,अजित सोर,मुक्ता गिरी,संजय नवले,अमोल मगर दशरथ गुंजाळ यांनी प्रशासनाने दिलेल्या प्रशासकीय सूचनांचे पालन करून गरजू कुटुंबांपर्यंत या जिवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. अजूनही ग्रामीण भागातील अनेक कुटुंब वंचित असून त्यांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे तरी,संस्था गावांतील दानशूर व्यक्तींना आवाहन करत आहे की त्यांनीही या कामी शक्य ती मदत करावी,जेणे करून इतरही ग्रामीण गरजू कुटुंबांपर्यंत ही मदत पोहचविणे शक्य होईल.