Corona Effect : दत्तनगर एटीएममध्ये पैसे नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप ; तात्काळ पैसे उपलब्ध करा ; अशोक लोंढे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 एप्रिल 2020
टिळकनगर|वार्ताहर|श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे दोन एटीएम असुन ही नसल्यासारखे आहे. कारण या दोन्ही एटीएम मध्ये कायम बिघाड किंवा पैसे नसल्याने  नागरिकांनमध्ये तीव्र संताप पसरला आहे.  परिसरातील  दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे, खंडाळा, रांजणखोल परिसरातील नागरिक  ह्या एटीएमचा वापर करीत असतात. मात्र एटीएम मध्ये पैसे नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने तात्काळ एटीएम मध्ये पैसे उपलब्ध करून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे.


           यासंदर्भात लोंढे यांनी तहसीलदार श्रीरामपूर व बँक शाखेला तक्रार दिली आहे. देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू आहे. बँकांनी बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी एटीएममध्ये पैसे टाकण्याची आवश्यकता असतांना एटीएममध्ये पैसे न टाकणे म्हणजे बँकेचा बेजबाबदार पणा दिसत आहे. एकीकडे एटीएम वरील व्यवहाराची मर्यादा काढल्यामुळे एटीएम कार्ड धारकांचा कल एटीएम कडे वाढलेला दिसत आहे.सध्या वेळेच्या बंधनात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यासाठी नागरिक कॅशलेस पद्धतीने व्यवहार करत आहेत. परंतु काही व्यवहार कॅशलेस पद्धतीने होऊ शकत नसल्याने लोक एटीएम व बँकांकडे धाव घेत आहेत. येथील एटीएम मध्ये पैसे नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. 

       लाँकडाऊन असताना पोलीस शहरात जाण्यास प्रतिबंध करत आहेत. पैसे नसल्याने नागरिकांना शहरात जावे लागत आहे. व  तेथेही पैसे काढणाऱ्याची मोठी गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी सबंधित बँकेच्या अधिकारी यांना सुचना करावी अशी मागणी,  दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी केली आहे

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post