Shrirampur : श्रीरामपूर तालुका विधी सेवा समितीची कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती

साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 मार्च 2020
श्रीरामपूर | विठ्ठल गोराणे |कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला  रोखण्यासाठी श्रीरामपूर तालुका विधी सेवा समिती आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनासोबत  ठिकठिकाणी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन व जनजागृती करत आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधाडे यांचे मार्गदर्शन  होत आहे. 
           आज भारतात नव्हे तर सर्व जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना परिस्थितीवर नियंत्रण आनण्यासाठी केंद्र व राज्य सरकार,पोलीस प्रशासन,आरोग्य प्रशासन ,महसूल आदी सर्व सज्ज झालेलं असून त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा  समिती अंतर्गत जिल्हा व तालुका विधी सेवा देखील सहभागी झालेले दिसून येत आहे.

        जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी  अंतर्गत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश श्री सलीम साहेब यांचा मार्गदर्शनाखाली पॅरा लीगल अँडव्होकेट म्हणून  अँड. क्रांती अशोक बागुल, अँड.रविंद्र सुभाष हाळनोर व अँड पंकज लक्ष्मण म्हस्के यांची नेमणूक केली असून हे सर्व अधिकरी  पोलीस ,प्रशासन ,आरोग्य विभाग,महसूल विभाग व जनतेस मदत करताना दिसत आहे.
     

              तालुका विधी सेवेचे अधिकारी शहरात तसेच ग्रामीण भागात नागरिकांपर्यत जाऊन त्यांना कोरोना विषाणू पासून कशी सावधगिरी बाळगली पाहीजे तसेच आपण स्वतःची व घरातील कुटुंबातील प्रत्यक्ष घटकाची कसे काळजी घेतली पाहिजे याबाबत विधी सेवेने नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्वास अनुसरून जनजागृती करताना दिसुत येत आहेत. पोलीस, आरोग्य व महसूल प्रशासनासोबत रस्त्यावरील लोकांना तोंडाला मास्क, ग्लोव्हज वापरण्याबाबत मार्गदर्शन करत आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत  जमधाडे मार्गदर्शन करीत आहे.

Rajesh Borude

1 Comments

  1. To eradicate COVID 19 Every one needs to come forward

    ReplyDelete
Previous Post Next Post