Nevasa : नामदार गडाखांच्या पुढाकाराने यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील गावागावात निर्जंतुक औषध फवारणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 एप्रिल 2020
नेवासा | दादा दरंदले |जगभरासह संपूर्ण  भारतभर कोरोना विषाणू धुमाकूळ घालत आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्षता घेत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही बाहेर पडणे बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर घाबरलेल्या जनतेला आधार देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करण्यास कटिबद्ध असलेल्या  यशवंत सामजिक प्रतिष्ठानच्या वतीने  व ना शंकरराव गडाख मृद ,जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने तालुक्यातील गावागावात निर्जंतुक औषध फवारणी करण्यात येत आहे. 

               सोनई ,बेलपिंपळगाव, घोगरगाव, सलाबतपुर,लोहोगाव, धनगरवाडी, जळके खु ,तामसवाडी,कांगोणी,शिंगवेतुकाई,वांजोळी,पुनतगाव,शिरेगाव,पानेगाव,सलाबतपुर,गिडेगाव,मुरमे,खलालपिंप्री, मडकी व घोडेगाव या नेवासा तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुक औषध फवारणी ट्रॅक्टरच्या व ब्लोअर मशीनच्या साह्याने  प्रतिष्ठानच्या गावागावातील कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करत संपूर्ण गावभर औषध फवारणी करण्यात आली आहे.

         तालुक्यातील जवळपास 75 % गावात आजपर्यत औषध फवारणी करण्यात आली आहे व राहिलेल्या गावातही फवारणी सुरू आहे.यामुळे गावे निर्जंतुक होण्यास मदत होणार आहे तसेच नागिरकांच्या मनातील भीतीही यामुळे दूर होणार आहे तसेच प्रतिष्ठानने योग्य ती काळजी घेत गावागावात कोरोना प्रतिबंधात्मक काय करावे व काय करू नये हे फलक लावल्याने नागरिकांना ती माहिती मिळत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने पुढील काही दिवस  तालुक्यातील सर्व गावात निर्जंतुक फवारणी केली जाणार आहे निर्जंतुक औषध ,ट्रॅक्टर ,ब्लोअर आदींची व्यवस्था प्रतिष्ठानच्या वतीने केली जात आहेत व प्रतिष्ठानचे गावागावातील कार्यकर्ते योग्य ती दक्षता घेत निर्जंतुक फवारणी करत कोरोना प्रतिबंधात्मक कार्यात आपला खारीचा वाटा उचलत आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post