साईकिरण टाइम्स ब्युरो, 31 मार्च 2020
श्रीरामपूर : प्रवरा व गोदावरी नदीकाठच्या गावांचा निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नदीपात्रातील बंधारे धरणाच्या पाण्यातून भरुन मिळावे, अशी मागणी युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती आणि याकरीता खासदार सदाशिवराव लोखंडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे आणि मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी देखील पाठपुरावा केल्याने आज प्रवरा नदीवरील के.टी वेअर बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहे.
करण सासणेंचे वर्क फ्रॉम होम ; घरातून कामाचा धडाका सुरु
सध्या कोरोना आजाराने थैमान घातले असून सर्वत्र संचारबंदी चालू आहे वर्क फ्रॉम होम यानुसार युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या घरातूनच कामाचा धडाका चालू ठेवला असून समयसूचकता दाखवत प्रवरा व गोदावरी नदीवरील बंधारे भरुन देणेकामी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी महसूलमंत्री थोरातांकडे केली होती यावर मंत्री महोदयांनी लगेच संबंधित विभागाला आदेश दिल्याने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
प्रवरा व गोदावरी नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी मागणी केली होती की, प्रवरा नदीवरील के.टी वेअर बंधारे भरुन घेण्यात यावे. यावरुन करण ससाणे यांनी समयसूचकता दाखवत थेट नामदार बाळासाहेब थोरातांशी संपर्क साधला आणि प्रवरा व गोदावरी नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले त्यावर नामदार थोरातांनी ससाणे यांनी केलीली मागणी मान्य करत प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आज प्रवरा नदी पात्रता पाणी सोडण्यात आले आहे.
लवकरच धरणांतून सोडलेले पाणी पोहचणार असून त्यामळे प्रवरा नदीवरील बंधारे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . याबाबत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहू कानडे आणि मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केल्याने धरणातून पाणी सोडणे सोईचे झाले आहे. प्रवरा नदीवरील बंधारे लवकरच भरले जाणार असल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.