साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 मार्च 2020
श्रीरामपूर | तालुक्यातील उक्कलगाव परिसरात कोरोनाच्या फैलावामुळे पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणांहून आलेल्या, नव्याने दाखल होत असलेल्या नागरिकांचा श्रीरामपूर व बेलापूर येथील आरोग्य खात्याचे कर्मचारी व गावकरी, गावातील वाड्या वस्त्यांवर घरोघरी जावून पाहणी करत आहेत.
![]() |
उक्कलगाव : गावात ठिकठिकाणी औषध फवारणी केली जात आहे. (छायाचित्र : भरत थोरात ) |
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उक्कलगाव गावठाण परिसर, वाडयावस्त्यावर, पटेलवाडी गावठाण भागात मंदिराजवळ, शासकीय कार्यालये, बॅका,गाळे बाजारतळ, आदी भागासह व गावासह औषध फवारणी करण्यात आली असून मदत म्हणून द्राक्ष बागायतदांरानी स्पे फवारणी यंत्राची मदत होत आहे. मदतीला गावातील द्राक्ष बागायतदाराचे सहकार्य लाभलेयाशिवाय आरोग्य विभागाकडून कोणाला ताप कोरडा खोकला सर्दी झाली आहे का ? यांचीही विचारणा केली केली जात आहे. कोरोनाचा आजार लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारी म्हणून दक्षता कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. काही दिवस पाहणी, तपासणी सुरुच राहणार असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्यांची माहिती द्यावी, असे प्रशासनकडून सांगण्यात आले. बाहेर गावावरून आलेल्या लोकांवर दक्षता कमिटी व आरोग्य विभाग करडी नजर ठेवून आहेत. परदेशातून आलेल्यांवर आरोग्य व पोलीस प्रशासनाचे लक्ष असुन दर दिवसाला आरोग्य तपासणी करत आहे. आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली देखरेखीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य विभागाकडून खबरदारी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असून उक्कलगाव उपकेंद्रचे आरोग्य विभागाचे कर्मचारी किरण दळवी घरोघरी जाऊन पाहणी करत बाहेरुन आलेल्या लोकांच्या हातावर शिक्के मारताना दिसत आहेत.