कोरोनाग्रस्तांसाठी सभापती सुनील गडाख देणार एका महिन्याचे मानधन
साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 मार्च 2020
नेवासा | दादा दरंदले | जिल्हापरिषदेचे अर्थ पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती सुनील गडाख यांनी एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्त यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक काळजी घेत शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. यात नागरिक व राजकीय मंडळीही सहकार्य करत आहेत. सुनील गडाख खरवंडी ता नेवासा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य व सभापती अर्थ पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती जिल्हा परिषद अहमदनगर यांनी स्वतःहून सामाजिक जाणिवेतून आपले मार्च 2020 महिन्याचे एक महिन्याचे मानधन कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावे असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अनगर यांना दिले आहे.या कृतीबद्दल गडाख यांचे सोशल मीडियातून कौतुक होत आहे.