साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मार्च 2020
अहमदनगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन अहमदनगर जिल्हयातील अहमदनगर महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपंचायत व अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डाचे हददीमध्ये नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी सर्व खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे वाहतूकीस आज मध्यात्रीपासून ते 31 मार्च 2020 या कालावधीत प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
.
सदरचा आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही.
1) सर्व शासकीय सेवांशी निगडीत वाहने.
2) रुग्नवाहीका, अग्नीशमन वाहने, वैदयकीय
उपचारासाठी लागणारे वाहने. (पुराव्यासह)
3) सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना यांचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह)
4) आजारी व्यक्ती तसेच रुग्णालय,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी,दवाखाने आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह)
5) प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक/नियतकालीके/टिव्ही न्युज चॅनेल इ.) यांचे कर्मचारी व प्रतिनिधी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह)
6) दुरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणा-या आस्थापनांकडील वाहने तसेच त्यांचे अधिकारी/ कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्यांसह)
7) भाजीपाला विक्री करणारे फेरीवाले.
8) एस.टी महामंडळ व अहमदनगर महानगरपालीका यांचेकडील बसेस.
9) अहमदनगर जिल्हयातील महानगरपालीका, नगरपालीका/नगरपंचयात व अहमदनगर कन्टोनमेंट बोर्ड हद्दीतून जाणारे राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील मालवाहतूकीची वाहने.(मात्र मालवाहतूक करणा-या वाहनातील प्रवासी वाहतूक प्रतिबंधित राहील.)