श्रीरामपूर : औषध शिल्लक असताना डास प्रतिबंधक फवारणी केली बंद, अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड ; केतन खोरेंचा आरोप


साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मार्च 2020
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये डास प्रतिबंधक फवारणी शहरात 2 दिवस पुरेल एवढेच औषध शिल्लक असल्याचे कारण देत बंद केल्याने, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, अक्षय वर्पे यांनी प्रत्यक्ष आरोग्य विभागात जाऊन पाहणी केली. तेथे ८ ते १० दिवस पुरेल इतके ८० ते ९० लिटर औषध आढळले. सोबतच १०० लिटर औषध आणखी येणार असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितल्याने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड झाला असल्याचा आरोप केतन खोरे यांनी केला आहे. आरोग्य विभागातील उपलब्ध औषध साठ्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावरही  व्हायरल झाला आहे.


             श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रशासन व नगरसेवक घेत आहेत. नगरसेविका सौ.स्नेहल खोरे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभागातील विषाणू, डास प्रतिबंधक फवारणी शहरात दोन दिवस पुरेल इतकेच औषध शिल्लक असल्याचे खोटे कारण देत बंद केली. त्यांनतर मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, अक्षय वर्पे यांनी प्रत्यक्ष आरोग्य विभागात जाऊन पाहणी केली असता ८ ते १० दिवस पुरेल इतके ८० ते ९० लिटर औषध आढळले. सोबतच १०० लिटर औषध आणखी येणार असल्याचेही तेथील कर्मचाऱ्याने सांगितल्याने आरोग्य विभाग अधिकाऱ्याचा खोटारडेपणा उघड झाला असल्याचे खोरे यांनी म्हंटले आहे.

                कोणतेही ठोस कारण नसताना आपत्कालीन परिस्थितीत चालू असलेली विषाणू, डास प्रतिबंधक फवारणी बंद केल्याने संतापलेल्या केतन खोरेंनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढत प्रभागातील फवारणी पुन्हा सुरू करून घेतली. कोरोनामुळे सगळीकडे अतिदक्षतेची परिस्थिती असताना हेतुपुरस्पर निष्काळजीपणा करत जनतेच्या आरोग्याची हानी करण्याचा प्रयत्न झाल्यास आरोग्य विभाग अधिकारी जबाबदार असतील,  असेही मोरया फौंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे म्हंटले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post