अहमदनगर : जिल्हयातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये मेडीकल, दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश


अहमदनगर : जिल्हयातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये मेडीकल, दुकाने सुरु ठेवण्याचे निर्देश 

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मार्च 2020
अहमदनगर : जिल्हयातील सर्व खाजगी दवाखाने, सर्व रुग्णालये तसेच सर्व मेडीकल दुकाने त्यांचे दैनंदिन वेळेनुसार सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. 

           राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहे. त्यास अनुसरून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

           आंतरराष्ट्रीय स्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत, असे प्रवासी अहमदनगर जिल्हयामध्येही प्रवास करुन आलेले आहेत. त्यामुळे कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव
पसण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोरोना साथ व इतर उपचारांसाठी जिल्हयातील खाजनी दवाखाने, रुग्णालये व मेडीकल दुकाने सुरु राहणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचे प्रसाराचे माध्यम पाहता सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तीस/इसमास त्याच्या संपर्कात आलेने होण्याची शक्यता विचारात घेता हे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post