अहमदनगर : लॉकडाऊन काळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना केतन खोरेंचे साकडे

लॉकडाऊन काळातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना केतन खोरेंचे साकडे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मार्च 2020
श्रीरामपूर |कोरोनाच्या विरोधातील लढ्यामुळे देशभरात लॉकडाऊन, महाराष्ट्रातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महिनाभर घरातच राहावे लागणार असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडणार असल्याने ऊर्जा, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः लक्ष घालून अत्यावश्यक असलेले काही प्रश्न राज्य शासनाकडून सोडवून घ्यावे अशी विनंती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दूरध्वनीवर संपर्क साधत केली.

            याबाबत माहिती देताना केतन खोरे यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट वाढू नये म्हणून सर्वांना घरात राहावे लागणार आहे. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टींवर राज्य शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे लक्ष वेधून सर्व शिधापत्रिका धारकांना सरसकट दोन महिन्यांचे धान्य वाटप करावे. व्यवसाय, नोकरी बंद असतानाही बँकांचे हप्ते, व्याज यातून नागरिकांना सूट मिळालेली नाही. बचत गट, मायक्रो फायनान्स, पतसंस्था, सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकांचे एप्रिल व मे महिन्यांचे हप्ते भरण्यास मुभा द्यावी व कोणतेही लेट चार्जेस, दंड आकारणी न करण्याचे आदेश राज्य सरकारने सर्व बँकांना द्यावे त्यासाठी तनपुरे यांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती खोरे यांनी केली.

        यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बोलताना, दोन महिन्यांचे सरसकट धान्यवाटप, बचत गट, फायनान्स, बँकांच्या हप्त्यांमध्ये दंड आकारणी करू नये म्हणून शासन स्तरावर पाठपुरावा व तात्काळ निर्णयासाठी प्रयत्न करू व आपण स्वतः मंत्री असलेल्या ऊर्जा खात्याचा सर्वसामान्यांच्या सध्या काळातील वीज बिलात कोणतीही दंड आकारणी करण्यात येणार नाही असा निर्णय घेणार असल्याची ग्वाही तनपुरे यांनी दिल्याचे खोरे यांनी सांगितले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post