घरात रहा, सुरक्षित रहा ; मंत्री शंकरराव गडाख
साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मार्च 2020
साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मार्च 2020
नेवासा | दादा दरंदले | खूप महत्त्वाचे काम असेल तर घराच्या बाहेर निघा सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी घरातच रहा सुरक्षित रहा व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन नेवासा येथे कोरोना रोगाचा आढावा घेताना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
नेवासा तहसील कार्यालयात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महसूल पोलीस प्रशासन आरोग्य विभाग यांच्या प्रतिनिधींची मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी बैठक घेतली. त्यावेळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. तालुक्यात किती लोक शहरातून आले आहेत परराज्यातील किती मजूर तालुक्यात आहे गोरगरीब लोकांना रेशनचे धान्य चांगल्या पद्धतीने मिळते का तालुक्यातील किती लोकांना घरातच क्वारटाईन केले आहे याबाबत तहसीलदार रुपेश सुराणा पोलीस निरीक्षक रणजित डेरे आरोग्य विभागाचे डॉ.अभिराज सूर्यवंशी डॉ.यादव यांच्याशी मंत्री गडाख यांनी चर्चा केली.