नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड



साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 17 मार्च 2020
नवी दिल्ली |सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची निवड राज्यसभेवर करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागी गोगोई यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं नाव नामनिर्देशित केलं. याबाबत (दि. 16) एक अधिसूचना जारी करण्यात आली.अधिसूचनेत म्हटलं आहे की, 'भारतीय संविधानाच्या कलम 80 तील खंड (3) सह पठित खंड (1) चा उपखंड (क) द्वारे प्रदत्त नियमानुसार राष्ट्रपती यांच्या द्वारे एका रिक्त जागेवर राज्यसभेसाठी श्री रंजन गोगोई यांना नामनिर्देशित करत आहोत'.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post