श्रीरामपूर मध्ये 26 जानेवारीपासून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
श्रीरामपूर|साईकिरण टाइम्स वृत्तसेवा|
22 जानेवारी 2020
येथील मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने व स्व. जयंतराव ससाणे यांच्या स्मरणार्थ 26 जानेवारी रोजी पूर्णवाद नगर, वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर येथे सकाळी 10 वाजता भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी देवा स्पोर्ट्स क्लब तसेच श्रीरामपूर येथील सर्व मेडिकल स्टोअर्स येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी 3 हजार 100 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक 51 हजार, द्वितीय 31 हजार, तृतीय 21 हजार व चतुर्थ पारितोषिक 11 हजार रुपये असे ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मातोश्री प्रतिष्ठान, साई सद्गुरू मित्र मंडळ, बेलापूर रोड मित्र मंडळ, श्री दक्षिणमुखी हनुमान मित्र मंडळ, श्री म्हसोबा महाराज मित्र मंडळ, शशांक रासकर, नगरसेवक मनोज लबडे, साई मल्टीस्टेट को ऑफ राहुरी फॅक्टरी, तुळजा फौंडेशन, तुळजाई अर्बन मल्टिपर्पज लि.श्रीरामपूर, नगरसेवक संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, श्री इम्पेक्सचे अविनाश कुदळे, नारायणराव डावखर, ममता स्विटस आदींचे सहकार्य लाभले आहे. स्पर्धेसाठी नितीन कासार, बाळासाहेब आगे आदींचे मार्गदर्शन राहणार आहे. सुनील राजुळे, संदीप पवार, अरुण थोरात, सचिन गाढे, गणेश कांबळे रवींद्र चाबुस्कवार, प्रमोद गायकवाड, फरीद शेख, अमोल राळेगणकर, अनिकेत लबडे, चेतन भोगे, मिरकांत चव्हाण, प्रशांत तांबे, डॉ. महेंद्र बोर्डे, महेश कोल्हे गणेश गडाख, कार्तिक जखवाडे आदींनी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
Tags
क्रीडा