११ व १२ जानेवारी रोजी कोपरगावात भव्य राज्यस्तरीय इंग्रजी वकृत्व स्पर्धा


कोपरगाव ( गौरव डेंगळे )
: शैक्षणिक विश्वात मानाची असलेली पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा यंदा ११ आणि १२  रोजी कोपरगावात होणार आहे.सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल,कोपरगाव यांच्यातर्फे श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे ६ वे वर्ष आहे. ही स्पर्धा शालेय गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते.गटात २ स्पर्धक पाठविण्याची शाळेंना संधी आहे.ही स्पर्धा राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते.स्पर्धकांना नियोजित भाषणासाठी प्रत्येकी ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धकांनी नियोजित आणि उत्स्फूर्त दोन्ही भाषणे करणे अपेक्षित आहे.स्पर्धेसाठीचे विषय पुढील प्रमाणे

Group A
  • 1) Arise, Awake And Stop Not Till The Goal Is Reached.
  • 2) India – The Torch Bearer Of Spiritual Wisdom.
  • 3) A Visionary Leader, Philanthropist – Shri Ratan Tata.
  • 4) Where The Mind Is Without Fear – A Call For True Freedom.

Group B
  • 1) AI – A Devil In Disguise?
  • 2) Climate Change – ‘A Call To Action’.
  • 3) Excessive Pride In Race, Religion, Region – A Threat To Peace.
  • 4) Freedom Need Guardians

वकृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम क्रमांकास १०,०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ७०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास ५०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र,चतुर्थ क्रमांकास ३०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र, पाचव्या क्रमांकास २०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि ५ उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/- रुपये प्रमाणपत्र व मानचिन्ह पारितोषिक देण्यात येणार आहे.वकृत्व स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सौ यास्मिन पठाण (9767786901) व सौ शिल्पा खांडेकर (9404612712) यांच्याशी संपर्क साधावा.पारितोषिक वितरण समारंभ १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post