निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे रस्त्याची निकृष्ट कामे झाली. संततधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून खड्यांना जलाशयाचे स्वरूप आले आहे. एकुणच या सर्व गोष्टींना वाढती कमीशनखोरी कारणीभुत असल्याचे मत नागरीकांमधुन व्यक्त झाले आहे.
दरम्यान कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे. समस्या जाणून घेऊन आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तसेच करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे शेतकरी व युवकांशी संवाद साधताना करण ससाणे आणि हेमंत ओगले यांनी आश्वासन दिले.
आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला त्यांच्यानंतरच्या काळात मात्र गावागावात विकास पहायला मिळाला नाही. अनेक गावात मंजुर कामे होत नाही. कामांना दर्जा नाही. भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असल्याची ग्वाही करण ससाणे यांनी दिली. भविष्यात आमच्या पाठीशी उभे राहून श्रीरामपूर विधानसभा स्व. जयंतराव ससाणे यांचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.