श्रीरामपूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शासनस्तरावरून राज्यभरात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर गोंधवणीतील महादेव मंदिरालगतच्या श्रीरामपूर नगरपालिका शाळा क्र. तीन मध्ये दि.२२ ते २८ जुलै दरम्यान 'शिक्षण सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा करून शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा उहापोह केला. आठवड्यातील सातही दिवस विशिष्ट उपक्रम राबविण्यात आले. रविवारी (दि. २८) परिसरातुन प्रभात फेरी काढुन शैक्षणिक जनजागृती केली व विद्यार्थ्यांना तिथीभोजन देण्यात आले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर करून ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यभरातील सर्व शाळांमध्ये शासकीय पातळीवरून शिक्षण साप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. नगरपालिका शाळा क्र.3 मध्ये सात दिवस विविध उपक्रम रावबविण्यात आले. अध्ययन-अध्यापन साहित्त्य निर्मिती दिवस, मुलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजीटल उपक्रम दिवस, मिशन लाईफ दृष्टीक्षेपात इकोक्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन पालिका शाळा क्र.३ मध्ये केले होते.
शिक्षण सप्ताहात विद्यार्थ्यांना मुलभूत ज्ञानासहीत संख्या ज्ञान, कौशल्य विकास, नेतृत्व गुण, कला व क्रीडा, पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, सांस्कृतिक, पोषण व अध्ययन-अध्यापनाविषयी विविध विषयांवरील उपक्रमांद्वारे सहभागी केले. शिक्षण सप्ताह यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.स्मिता साळवे, शिक्षक श्री.राजू गायकवाड, श्री.सचिन डोखे, श्रीमती प्राची लोळगे, सौ.पल्लवी बोरुडे आदींनी परिश्रम घेतले.