श्रीरामपुरात राहुल गांधींचा तीव्र निषेध ; 'जोडे मारो' आंदोलन


श्रीरामपूर : संसदेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माचा अपमान केला व चुकीचा संदेश देऊन हिंदू 'जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात ते हिंस्र असतात असत्य असतात' अशा प्रकारे भाषण केलं. याचा निषेध म्हणून श्रीरामपूर शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

               यावेळी विश्व हिंदू परिषद श्रीरामपूर पालक व जिल्हा गोरक्षण संवर्धन प्रमुख कुणाल करंडे बोलताना म्हणाले की, राहुल गांधी यांचे हिंदू विरोधी विधान अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. समाजात समाजात फुट पाडण्याचा हा खूप भयंकर डाव आहे आणि तो आपणा सर्व हिंदूंना मोडीत काढायचा आहे. व सकल हिंदू समाज वज्रमूठी समान एक बनवायचा आहे.

          यावेळी भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश भिसे युवा मोर्चाचे जि.उपाध्यक्ष रुपेश हरकल, सामाजिक कार्यकर्ते मनोज भैय्या भिसे शिवसेना शहराध्यक्ष उमेश पवार, विहिंप प्रखंड मंत्री श्रीराम कौदरे पा. बजरंग दल तालुका संयोजक समर्थ सोनार, शहर संयोजक मंगेश भोसले, आदिनाथ सुपेकर, हितेश निकुंभ, भूषण जगताप अभावीपचे प्रथमेश जोशी, नितीन उंडे,व्यंकटेश अडांगळे अक्षय भिसे, गोटू पाटील, तेजस उंडे,सचिन अजगे यांच्यासह श्रीरामपुरातील अनेक हिंदू या ठिकाणी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post