संगमनेर येथील कासारा दुमाला विद्यालयात आयोजित सभेत महल्ले बोलत होते. दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली, येथे दाखल याचिकेत २२ ऑगस्ट २०२३ ला सुनावणी होत आहे त्या निमित्ताने मूळ याचिकाकर्ते श्री प्रदीप महल्ले , श्री प्रशांत पुसदेकर ,श्री दीपक बोकडे. श्री सचिन पिसे शिर्डी येथे साई दर्शन घेऊन नगर जिल्ह्यातील पेंशन पीडितांना न्यायालयीन स्थिती जाणून घेण्यासाठी रविवार 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7. 30 वा. काशेश्वर विद्यालय कासारा दुमाला येथे सहविचार सभेस उपस्थित होते . संगमनेर व अकोले तालुक्यातील पेन्शन पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या विविध प्रश्नांना याचिकाकर्तांनी समर्पक मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत कासारा दुमाला विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक जुनी पेन्शन योजना समन्वयक प्रा. संजय वाळे यांनी तर सुत्रसंचालन अर्जून वाळके यांनी केले उपस्थितांचे आभार बाबासाहेब गुळवे यांनी मानले.यावेळी संगमनेर, अकोले तालुक्यातील अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.