माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा ११६ कार्यकर्त्यांसह मुख्यमंञी के.चंद्रशेखरराव यांचे उपस्थितीत बी.आर.एस पक्षप्रवेश


लोकनेते माजी आमदार श्री भानुदासजी मुरकुटे यांचा भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणा राज्याचे मुखयमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये भारत राष्ट्र समिती BRS पक्षांमध्ये भव्य प्रवेश झाला.

हैद्राबाद - तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर ११६ प्रतिनिधींसह गेलेल्या माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंञी कै.चंद्रशेखरराव यांचे उपस्थितीत भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. 

                            शनिवार (ता.२२) रोजी तेलंगणाचे मुख्यमंञी के.चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी माजी आ.भानुदास मुरकुटेंसह ११६जणांचा  बी.आर.एस.मध्ये प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी बी.आर.एसचे नेते माजी आ.अण्णासाहेब माने पाटील,महाराष्ट्र किसान सेलचे अध्यक्ष माणिकराव कदम,पूणे विभाग समन्वयक बी.जे.देशमुख,ज्येष्ठ नेते दशरथ सावंत,घनश्याम शेलार,अब्दुल कादीर मौलाना,बंजारा समाजाचे नेते प्रल्हाद राठोड,आ.जीवन रेड्डी आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

                                 यावेळी मुख्यमंञी    के.चंद्रशेखर राव व माजी आ.मुरकुटे यांच्यात चर्चा झाली.यादरम्यान महाराष्र्टासाठी तेलंगणाच्या धर्तीवर काय करता येईल तसेच गोदावरी नदीवरील कालेश्वरम उपसा सिंचन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील  गोदावरी खो-यासाठी अशी योजना राबविता येईल का,यावरही सविस्तर चर्चा झाली.माजी आ.मुरकुटे हे दोनवेळा तेलंगणा दौऱ्यावर गेल्याने त्याच्या बी.आर. एस पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती.अखेर सदर चर्चा प्रत्यक्षात उतरवून माजी आ.मुरकुटे यांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post