राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कूल पुणेला विजेतेपद, ७ वेळा राज्य स्पर्धेचे विजेतेपद


सासवड (पुणे) गौरव डेंगळे ३०/४/२०२३ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल १४ वर्षा खालील मुले- मुली स्पर्धाचे आयोजन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड यांच्या वतीने दिनांक २७ ते २९ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मुलींमध्ये पुणे विभागाचे नेतृत्व करताना मिलेनियम नॅशनल स्कूल,पुणे संघाने मुंबई,अमरावती,नागपूर, कोल्हापूर संघांना पराभव करत विजेतेपद पटकावले.

उपांत्य फेरीच्या लढतीत नागपूर विभागा विरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यात पुणे विभाग संघाने २५-०८ व २५-१० ने विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.कोल्हापूर विभागाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात देखील पुणे विभाग संघाने व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्यात आपले वर्चस्व सिद्ध करताना कोल्हापूर संघाचा २५-०८,२५-१० व २५-०८ ने पराभव करून ७ व्या वेळेस राज्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

विजेत्या संघाकडून उपज्ञा कारले,सानिका केळकर,अन्वी गोसावी,संजना गोठस्कर,उमा सायगावकर,आहाना ठकार,सई जगताप,सुप्रिया कोंडे,सौमिनी बॅनर्जी,मालविका फडके,गीत सागजकर ,रुजुता डोंगरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघास राष्ट्रीय प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे,श्री सचिन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संचालक श्री अन्वित फाठक आणि अंचिता मॅडम यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post