श्रीरामपूर पंचायत समिती : अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे हरेगावात कोट्यवधी रुपयांची कामे उखडली, कामात अनियमितता ; श्रीरामपूर नगरपरिषद : रस्त्यांची निकृष्ट कामे ; ठेकेदारधार्जिन्या प्रशासनविरोधात 'इन्कलाब आंदोलन'


श्रीरामपूर (राजेश बोरुडे : संस्थापक, 'साईकिरण टाइम्स') भ्रष्ट व्यवस्थेविरोधात 'साईकिरण टाइम्स'ने मोहीम उघडली असून, आता कोणाचीही गय केली जाणार नाही. लोकांच्या सर्वांगीन विकासासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे करते, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. मात्र, या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्ट, कामचुकार, मुजोर अधिकारी-कर्मचारी ( जनतेचे नोकर ) लोकांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशाने स्वतःचे घर भरून ऐशो-आरामात जीवन जगत आहेत. श्रीरामपूर पंचायत समिती व श्रीरामपूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेक निकृष्ट, दर्जाहीन कामे करून गोरगरीब जनतेच्या पैशाने स्वतःचे खिशे ठासून-ठासून भरण्याचे काम भ्रष्ट, दोषी अधिकारी-कर्मचारी करत आहेत. ठेकेदाररांकडून टक्केवारीची रसद घेतलेली असल्यामुळे जनतेने केलेल्या निकृष्ट कामांच्या तक्रारीची दखल घेऊन कंत्राटदारावर कारवाई करायला अधिकारी 'कांडे' झालेले असतात. तक्रारी करूनही जर कंत्राटदार व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर 'इंन्कलाब आंदोलन' छेडण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली झालेल्या अनेक कामात संबंधित अधिकारी, अभियंते, ग्रामसेवक, कंत्राटदार-मजूर संस्था यांनी संगणमताने अत्यंत दर्जाहीन, अर्धवट कामे करून लाखो रुपयांचा अपहार केला आहे. श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतही अधिकाऱ्यांच्या टक्केवारीखोरीमुळे शहरात निकृष्ट कामे करून शहराची पुरती वाट लावली. वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनही मुख्याधिकारी व शहर अभियंता कंत्राटदारावर कारवाई करत नसल्याने त्यांनी ठेकेदाराकडून टक्केवारी घेलत्याचे उघड होत आहे.
टक्केवारीखोरीमुळे श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे दलित वस्ती योजेनेतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या गटारी, काँक्रेट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक रस्ते आदी कामात मोठया प्रमाणात अनियमितता, गैरप्रकार झाला आहे. या सर्व कामांची चौकशी होऊन दोषी अभियंता, अधिकारी, ग्रामसेवक यांनी कंत्राटदार मजूर संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन ठेकेदार एजन्सी, मजूर संस्था यांचा परवाना रद्द झालाच पाहिजे. हरेगाव येथे सन 2021-22 या कालावधीत दलित वस्ती योजेनेतर्गत गावठाण, एकवाडी, तीनवाडी, पाचवाडी कृष्णवाडी, महाजनवाडी, बुध्दविहार, जमधडे वस्ती,रुपा नगर, येथे केलेले काँक्रेट रस्ते, पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते, गटारी या कामांत मोठया प्रमाणात अनियमितता ,गैरप्रकार होऊन आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे. कामे ही अत्यंत निकृष्ट, नियम बाह्य अंदाजपत्रकानुसार तांत्रिक बाबींचे पालन केलेले दिसत नाही. थातूरमातुर कामे करून शासनाची, जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या कामात संबंधित अभियंते, अधिकारी, ग्रामसेवक व कंत्राटदार मजूर संस्था-ठेकेदार यांनी संगणमताने अत्यंत दर्जाहीन, अर्धवट कामे करून लाखो रुपयांचा अपहार केला आहे. कामे घेणाऱ्या कंत्राटदार मजूर संस्थेने गावठाणामध्ये गटारिंचे कामे अर्धवट, थातूर-मातुर केले. गावठाण मध्ये पूर्वी बांधलेल्या गटारीतच खोदाई न करता, लेव्हल न घेता पाईप टाकले. तसेच जमधडे वस्ती येथील पेव्हिंग ब्लॉक रोड आहे त्या वस्तीत न करता दुसरीकडेच करण्यात आला आहे. बुद्धविहार समोरील पेव्हिंग ब्लॉक रस्ता, कृष्णवाडी, महाजनवाडी, एकवाडी, तीनवाडी येथील  पेव्हिंग ब्लॉक निकृष्ट रस्ता, पाचवाडी, रूपानगर येथील सर्वच काँक्रेट रस्ते, पेव्हिंग ब्लॉक रस्ते अत्यंत निकृष्ट केले असून रस्ते जागोजागी उखडले, पेव्हिंग ब्लॉक निघालेले आहेत. काँक्रेटच्या रस्त्यांना ठिकठिकाणी क्रॅक गेलेले आहेत. या सर्वच रस्त्यांच्या कामांत सिमेंट अत्यल्प वापरल्यामुळे रस्ते जागोजागी फुटलेले आहेत. रस्त्याना साईड पट्ट्या, भराव केलेला नाही. सर्वच रस्त्याच्या कामांत अतिशय निकृष्ट मटेरियल वापरलेले आहे.
दरम्यान, श्रीरामपूर पालिका हद्दीतही हिच परिस्थिती आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचे काम प्रशासनकडून सुरु आहे. राजेश बोरुडे यांनी मुख्याधिकारी, नगर अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निकृष्ट काम होत असलेबाबतचे वेळोवेळी पुरावे दाखविले व लेखी तक्रारही केली होती. केली होती.  नुकताच केलेला वलेशा पथ रस्ता, सिविल कोर्ट ते बॅडमिंटन कोर्टकडे जाणारा रस्ता, पोलीस ग्राउंड लगतचा रस्ता, झुलेलाल पथ रस्ता, इराणी गल्ली-रेल्वे लाईन लगतचा, अचानक नगर मधील रस्ते, या सर्व  रस्त्यांचे कामे निकृष्ट मटेरियलचा वापर करून व दर्जाहीन पद्धतीने सुरु असल्याने या रस्त्यांचे कोणतेही देयके ठेकेदारास अदा करू नये. करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे रस्त्यांच्या कामातील खराब मटेरियल काढून रस्ते पुन्हा बनविण्यात यावे. निकृष्ट रस्त्यांचे कामे करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर नियमोचित कारवाई करावी. इतर रस्त्यांचे कामे थांबविण्यात यावी, अशी तक्रार राजेश बोरुडे यांनी करूनही प्रशासनाने ठेकेदाराला पाठशी घातले. टक्केवारी घेतली असल्यामुळेच ठेकेदारावर कारवाई झाली नसल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला. निकृष्ट कामामुळे वारंवार तेच रस्ते करून जनतेच्या पैसा ठेकेदार व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात जात असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post