श्रीरामपूर : जवाहरलाल नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे महाराष्ट्र युवा खेल परिषद अंतर्गत दिनांक १८ ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या सी डी जैन महाविद्यालयातील विद्यार्थीनी वैष्णवी दादासाहेब हजारे हिने सुवर्णपदक प्राप्त केले. तिची हिमाचल प्रदेश येथे २० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या (आर्चरी ) स्पर्धेसाठी १९ वर्ष वयोगटामध्ये राष्ट्रीयपातळीवर निवड झाली आहे.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपूर चेअरमन मा.मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य मा. प्रकाश निकम पाटील, एड.विजयराव बनकर पाटील, डॉ.राजीव शिंदे मा.सुजितदादा जगधने, प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे सर, प्राचार्य डॉ.बडधे सर, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब बावके, जिमखाना विभागप्रमुख प्रा.सुभाष देशमुख, वाणिज्य संशोधन विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कळमकर, कोच नंदकुमार लांडगे, पर्यवेक्षक प्रा.शेख एम. एन, क्रीडा शिक्षक प्रा. बनसोडे सर, प्रा.शेळके सर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.