श्रीरामपूर पालिका | राजेश बोरुडे यांच्या तक्रारीची पालिकेकडून दखल ; रस्त्यांची दर्जाहीन कामे : दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार..!


'इन्कलाब' भाग १

श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : पालिका हद्दीत विविध ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या दर्जा व गुणवत्तेबाबत राजेश बोरुडे यांनी केलेल्या तक्रारीची पालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. राजेश बोरुडे यांनी पालिकेचा निधी थांबवुन, निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु ठेवला आहे. दरम्यान, राजेश बोरुडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रस्त्यांच्या कामात निकृष्ट साहित्त्याचा वापर करण्यात आला असल्याने कामाचे टेस्टींग रिपोर्ट सादर करून करारनाम्यातील व निविदेतील अटी-शर्तीचा भंग झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने कंत्राटदार विक्रांत महाले यांना दिला आहे.

राजेश बोरुडे यांनी मुख्याधिकारी, नगर अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निकृष्ट काम होत असलेबाबतचे वेळोवेळी पुरावे दाखविले व लेखी तक्रारही केली होती. केली होती.    कंत्राटदार विक्रांत महाले यांनी नुकताच केलेला वलेशा पथ रस्ता, सिविल कोर्ट ते बॅडमिंटन कोर्टकडे जाणारा रस्ता, पोलीस ग्राउंड लगतचा रस्ता व झुलेलाल पथ रस्ता या चारही रस्त्यांचे कामे निकृष्ट मटेरियलचा वापर करून व दर्जाहीन पद्धतीने सुरु असल्याने या रस्त्यांचे कोणतेही देयके ठेकेदारास अदा करू नये. करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे रस्त्यांच्या कामातील खराब मटेरियल काढून रस्ते पुन्हा बनविण्यात यावे. निकृष्ट रस्त्यांचे कामे करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर नियमोचित कारवाई करावी. इतर रस्त्यांचे कामे थांबविण्यात यावी, अशी तक्रार राजेश बोरुडे यांनी केली आहे. दरम्यान, तक्रारीच्या अनुषंगाने सदर कामाच्या समक्ष पाहणीमध्ये तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यास कामाच्या करारनाम्यातील व निविदेतील अटी शर्तीचा भंग केल्याचे समजून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने ठेकेदाराला दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post