कार्यकारी संचालक मंडळात इटली येथील सेरगिओ लुगारेसी, युएसएच्या चांताली वाँग, समीर कुमार खरे, टेकेओ कोनीशी, मुख्य प्रकल्प संचालक टोयॅचीक, मुरुगराज, समन्वयक विशेषज्ञ राजेश देओल, वाहतुक विशेषज्ञ शिवा राजु डोडला, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे सचिव के.टी.पाटील आदींनी पवनार ते सूरगाव दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, नागपूर विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अन्सारी, कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सी.पी.कारीया, उपअभियंता व्ही.व्ही.चावरे, व्हि.ए.डेकाटे, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी संचालकांनी सूरगाव येथे सूरगावचे सरपंच मुक्तार शेख, पोलिस पाटील रसिका कांबळे तसेच आरोग्य उपकेंद्राच्या परिचारिकांशी संवाद साधून रस्ता बांधकामामुळे झालेल्या लाभाविषयी माहिती जाणून घेतली.
आशियाई विकास बँकेच्या निधी मधून बांधण्यात आलेल्या पवनार ते सूरगाव हा साडेचार किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात आला आहे. या रस्त्याची कार्यकारी संचालक मंडळांने पाहणी केली. त्यानंतर पवनार रोडवरील सूरगाव चौरस्त्यावर रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपणही केले तसेच सेवाग्राम येथील बापूकुटीत त्यांनी भेट देऊन आश्रमविषयी माहिती जाणून घेतली.