भारत जोडो यात्रेत दिपाली ससाणे यांनी साधला राहुल गांधीशी संवाद


श्रीरामपूर : काँग्रेस नेते राहुलजी गांधींची बहुचर्चित कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 'भारत जोडो यात्रा' नांदेडमध्ये दाखल झाली असता, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.दिपाली करण ससाणे यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी  देशाचे व काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्याशी संवाद साधला.

भेटी दरम्यान दिपाली ससाणे यांनी कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन करणे गरजेचे असून, या विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे व मुलींच्या विवाहासाठी उपाययोजना करणे अतिशय गरजेचे असल्याचे म्हंटले. देशातील वाढती महागाई व बेरोजगारी या समस्यांबरोबरच कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे अशा विधवा महिलांना घरातील प्रपंच चालवणे अवघड झाले आहे. दोन वर्षानंतर कोरोना संपला असला तरी या महिलांच्या समस्या मात्र संपलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या विविध योजना या विधवा महिलांपर्यंत पोहोचल्या जातात की नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली पाहिजे, असेही राहुल गांधीशी केलेल्या चर्चे दरम्यान सौ.दिपाली ससाणे यांनी म्हटले. चर्चेदरम्यान महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत असल्याचे सांगितल्यानंतर राहुल गांधींनी ही आस्थेने चौकशी केली.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post