बेलापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या वतीने गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी, या करीता १०० रुपयात साखर, तेल, रवा, चनाडाळ हा 'आनंदाचा शिधा' श्रीरामपूर तालुक्यात पोहोच झाला असून, त्याचे वितरण उपविभागीय आधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, भाऊसाहेब वाघमारे, रज्जाक पठाण, गोपीनाथ शिंदे, शिवाजी सईद, माणिक जाधव, गोदाम व्यवस्थापक अर्जुन सानप, गोदामपाल मिलींद नवगीरे, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले आहे.
सणासुदीचा काळ लक्षात घेता सर्व दुकानदारांनी आंनदाचा शिधा प्रत्येक कार्डधारकांना मिळेल याची काळजी घ्यावी तसेच दुकानात माल पोहोच होताच दुकानदारांनी तात्काळ वाटप सुरु करावे कुणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी तक्रार येणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल असा ईशारा उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिला आहे.