आठव्या टप्प्यात बचत गटांना ३३ लाख रुपये कर्जवाटप ; ससाणे : आतापर्यंत १२९ बचत गटांना १ कोटी २९ लाख रुपये कर्जांचे वाटप


श्रीरामपूर : सर्वसामान्य महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे हे स्वर्गीय माजी आ. जयंतराव ससाणे यांचे स्वप्न होते. त्यांचाच वारसा कायम ठेवत आम्ही श्रीरामपूर शहरातील बऱ्याच कुटुंबांना भेटी दिल्या. त्यावेळेस आमच्या निदर्शनात आले की कोरोना मध्ये कर्ता पुरुष गेल्याने बऱ्याच  कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे अशा कुटुंबाचे केवळ सांत्वन करून चालणार नाही, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत बचत गटांच्या माध्यमातून कर्ज वाटप योजना सुरू केल्याचे  मा उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी म्हटले.

महिलांनी छोटे छोटे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लावावा हा या मागचा हेतू असल्याचेही ते पुढे म्हणाले.  श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटी, श्री शक्ती ग्रुप व जिल्हा बँकेच्या वतीने आठव्या टप्प्यातील ३३ जे एल जी महिला बचत गटांना ३३ लाख रुपयांच्या कर्ज वाटप प्रसंगी ससाणे बोलत होते. आतापर्यंत  १२९ बचत गटांना १ कोटी  २९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले , स्वर्गीय ससाणे साहेबांचा जन विकासाचा संकल्प करण व दिपाली ससाणे यांनी हाती घेतलेला असून ,सामाजिक कार्यातून ससाणे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावल्या शिवाय राहणार नाही . यावेळी गुजर यांनी स्व ससाणे साहेबांनी सर्वसामान्य महिलांसाठी केलेल्या कामांच्या अनेक आठवणी जागवल्या. यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ दिपालीताई ससाणे म्हणाल्या , महिला सक्षमीकरण हा आमचा ध्यास असून ,महिलांनी स्वयंपूर्ण होऊन स्वाभिमानाने जगले पाहिजे.  यानंतर जिल्हा बँकेचे नोडल ऑफिसर साळवे यांनी बचत गटांच्या कामाविषयी माहिती दिली. 

सदर बचत गटाच्या कर्जवाटप प्रसंगी मा नगराध्यक्ष संजय फंड, मा नगरसेवक रितेश रोटे, मनोज लबडे, आशिष धनवटे,सुहास परदेशी,प्रदीप कुऱ्हाडे,प्रताप देवरे,प्रवीण नवले, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष सरबजीतसिंग चुग, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जाफर शहा, अशोक जगधने,युनूस पटेल,रितेश एडके,सुरेश ठुबे,बाबा वायदंडे,संतोष परदेशीं ,लक्ष्मण शिंदे, संजय गोसावी, संजय साबळे,प्रमोद गाडेकर,अशोक शिरसाठ, श्रीरामपूर मार्केट शाखेचे व्यवस्थापक अशोक पटारे, शिवाजी रोड शाखेचे व्यवस्थापक व्यवस्थापक श्री. जगधने, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश चव्हाणके, उपाध्यक्ष शाहरुख शेख,सुनील जगताप, कृष्णा पुंड ,राजेश जोंधळे, प्रताप गुजर, विशाल साळवे, सौ.आशाताई परदेशी,सौ. त्रिवेणी गोसावी ,श्रीमती .महंकाळे ताई व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post