उक्कलगाव'च्या जयदिप शिंदे यांची उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे निवड


उक्कलगाव : श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील जयदिप गणेश शिंदे यांची एमटेक फुड सायन्स ( M.tech Food Science ) या इंग्लंड येथील कार्डीफ मेट्रोपॉलिटियन युनिव्हर्सिटीमध्ये या विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी नुकतीच निवड झाली असून उक्कलगावचे प्रगतशील शेतकरी दगडू शिंदे व आदर्श शिक्षक पाटीलबा खपके यांचे ते नातू आहे.

कमालपूरचे काशिबाई पा. मुरकुटे विद्यालयाचे शिक्षक जी. डी‌. शिंदे यांचे ते चिरंजीव आहेत. उक्कलगावचे प्रगतशील शेतकरी विजय शिंदे व संजय शिंदे ते पुतणे असून, श्रीरामपूरचे प्रथित यश पॅथॉलॉजिस्ट डॉ.दिनानाथ खपके यांचे ते भाचे आहेत. इंग्लंड येथे जयदिप शिंदे यांची निवड झाल्याबद्दल विविध शैक्षणिक सामाजिक धार्मिक स्तरातून आणि उक्कलगाव ग्रामस्थानी त्यांचे अभिनंदन केले आहेत.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post