श्रीरामपूर : श्रीरामपूर शहारालगत भैरवनाथ नगर-गोंधवणी येथील प्राचीन महादेव मंदिर परिसरात आजपासून ( दि.१८) दर रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान आठवडे बाजार भरणार असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान, भैरवनाथनगर ग्रामपंचायत व महादेव मंदिर ट्रस्टच्या सहकार्यातून बाजार भरत असून, शेतकरी, ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन भैरवनाथ नगर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
भैरवनाथनगर हे शहारालगतचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळेल. श्रीरामपूरच्या बहुसंख्य नागरिकांनाही हा बाजार सोयीचा ठरणार आहे. गोंधवणी व लगतच्या गावातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी आणता येणार आहे.
यासाठी भैरवनाथ सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, अध्यक्ष सुखदेव देवकर, उपाध्यक्ष अनिल वायकर, खजिनदार सुनील नेरकर, रवी आसने, सचिव राजू चौधरी, सदस्य राजेंद्र लबडे, बंटी थोरात, प्रकाश लबडे, महेश जगताप, हरिश्चंद्र लबडे, नितीन करंडे, मधुकर लबडे, अरुण लबडे, विजय पाचारे, बाळासाहेब शेळके, श्री वहाडणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.