यासंदर्भात पालिका प्रशासनाला निवेदन दिले असून त्यात म्हंटले आहे की, सध्या श्रीरामपूर शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्यावर पालिका प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेत आहे. वाहनांना आडवे येऊन अपघातही होत आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नुकतेच सरस्वती कॉलनीतील एका बालकास या मोकाट कुत्र्यांची चावा घेवून गंभीर जखमी केले. या मोकाट कुत्र्यांच्या चावण्याने निरपराध नागरिकांना जीवीतास काही बरे वाईट झाले तर याची जबाबदारी कोणाची ? नगरपालिका प्रशासन ही जबाबदारी घेणार का ? असे सवालही जमादार यांनी उपस्थित केले.
मोकाट कुत्र्यांचा आठ दिवसात योग्य तो बंदोबस्त करावा, अन्यथा शहरातील मोकाट कुत्र्यांना नगरपालिका कार्यालयाच्या आवारात सोडून देऊ ,असा इशारा समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी दिला आहे. या यावेळी आसिफ तांबोळी, अय्युब पठाण, इमरान शेख, एजाज़ शाह, ज़करिया सैय्यद, अरबाज़ क़ुरैशी,शहेजाद शेख, दानिश शेख, निसार शेख, दानिश शाह,रफीक शेख, रियाज़ शेख, आदी उपस्थित होते.